
सर्वार्थाची सोलापुरात दुसरी आय.टी. कंपनी : वोल्फगांग प्लाट्झ सर्कल ऑफ एक्सलन्सची घोषणा | SARVARTH IT PARK
सोलापूरच्या शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल टाकत सर्वार्थ ने एक दुसऱ्या IT कंपनीची घोषणा केली आहे. सोलापूरच्या तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत, सर्वारथनं सोलापुरातील दुसऱ्या आयटी कंपनीचे, अर्थात सर्वार्थ सोलापूरची अधिकृत स्थापना केली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या प्रमुख शैक्षणिक उपक्रमाचे, म्हणजेच ओल्फगांग प्लाट्स सर्कल ऑफ एक्सिलन्स, याची घोषणा करण्यात आली आहे. याचा उद्घाटन सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर इथे नुकताच संपन्न झाला.
IT कंपनीचे संस्थापक व महाराष्ट्रातील शिक्षण विभागाती वरिष्ठ व्यक्ती कार्यक्रमास उपस्तित
यात महाराष्ट्रातील मान्यवरांची तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास ओल्फगांग प्लाट्स यांचे सोलापुरातील उपस्थिती ही सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व, व्यक्तिमत्व आणि सर्वार्चे बोर्ड सदस्य म्हणून त्यांची ख्याती असून, त्यांनी यानिमित्त विद्यार्थ्यांसोबत एक प्रेरणादायी सत्र देखील घेतलं, ज्यात करिअर मार्गदर्शन, नेतृत्व, कौशल्य आणि जागतिक तंत्रज्ञानातील नवोन्मेष यावर सखोल चर्चा झाली.
जागतिक क्षेत्रामध्ये IT कंपनीची मागणी व रोजगार निर्मिती बद्दल
त्यांनी यावेळी सोलापूरच्या वाढत्या आयटी क्षमतेकडे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना आंतरराष्ट्रीय लक्ष देखील वेधले. कार्यक्रमात सुपर 30 विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला, हे विद्यार्थी अत्यंत प्रतिभावान असून आता सर्वार्च्या माध्यमातून स्थानिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांना घडवलं जाणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना यानिमित्त आयटी क्षेत्रात करिअर घडवण्याची एक सुवर्ण संधी मिळत असून, सर्वार्थच्या डब्ल्यूपीसीओई यामध्ये आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
जाणून घ्या करियरची संधी व फायदे
बीसीए अर्थात बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, हा बारावी नंतरचा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम या ठिकाणी राहणार असून, एमबीए इन आयटी अँड टेक मॅनेजमेंट यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अनुभवी इंडस्ट्री मेंटर्सकडून या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच लाईव्ह प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप, प्लेसमेंटची संधी देखील या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमास ओल्फगांग प्लाट्सचे बोर्ड मेंबर तसेच सर्वार्चे चेअरमन अँड फाउंडर वैभव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शर्मा, सर्वार्थ सोलापूरचे सीईओ सुमित कुडल, सर्वार्चे बिझनेस कन्सल्टंट राकेश रामपूर, मुख्य परिचालन अधिकारी सर्वार्थ, अनिकेत चानशेट्टी, तसेच सिंहगडचे प्राचार्य, डॉक्टर शंकर नवले आदींची उपस्थिती होती.